एकांत एकला सर्व आहे
775.
एकांत एकला सर्व आहे हरी|ऐसेंचि अहर्निशी ध्यायिजे तू|१|सर्वांभूती विठ्ठल आहे आहे साचे|हे तंव वेदींचे वचन जाण॥२॥
मार्ग हाचि सोपा गेले मुनिजन|जनी जनार्दन हाचि भावो॥३॥
नाही म्हणून म्हणे नाम मंत्र उच्चारण| सर्वही कारण होईल तुझें॥४॥
