रामनाममहिमा - अभंग ७
724.
रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
शिवाचे हृदयी नांदसी श्रीरामा ।
काय वर्णुं महिमा न कळे आगमानिगमां ॥१॥
वेदशास्त्रे मौनावलीं पुरणे भांबावलीं ।
श्रुति म्हणती नेति नेति शब्दे खुंटली ॥२॥
वाच्य वाचक जगन्नथ स्वये शिवाचा आत्माराम ।
एका जनार्दनी सुख तयांसी गाता निष्काम ॥३॥
