वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 47. विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३

विठ्ठल म्हणता विठ्ठल

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084109 · अभंग क्र. ७१७

717.
विठ्ठल म्हणता विठ्ठलाचि होसी । संदेह येविशी धरु नको ॥१॥
सागरी उठती नाना पईं तरंग । सिंधु तो अभंग विठ्ठल एक ॥२॥
तैसे मन करी द्वैत न धरी । सर्व चराचरी विठ्ठल एक ॥३॥
एका जनार्दनी विठ्ठलावांचुनी । दुजा नेणो कोणी स्वप्नी आम्ही ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग