वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १४. आपल्या स्थितीसंबंधाने देवाशी उद्गार

पडे आता दिवसराती ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089275 · अभंग क्र. ७३१

731.
पडे आता दिवसराती ।
विसर तुमचा श्रीपती ।
झाली इंद्रिया विश्रांति ।
रंगली नामचिंतने ॥१॥
वदनी सुंदर तुमचे नाम ।
डोळिया रुप मेघश्याम ।
श्रावणी ऐकता उत्तम ।
गुण तुमचे गोविंदा ॥२॥
हाते वाजविता टाळी ।
चरणे नृत्य कथाकाळी ।
गोजिरे ध्यान हदयकमळी ।
तेचि ठसावोनि राहिले ॥३॥
मस्तक म्हणे चरणांवरी ।
माझा ठाव निरंतरी ।
जिव्हा रंगली नामोच्चारी ।
न राहे क्षणभरी आठविता ॥४॥
निळा म्हणे माझा हेत ।
होउनी ठेला मुद्रांकित ।
सदा सर्वदा गावे गीत ।
हेचि चिंतूनि राहिला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग