उघडा हा मंत्र विठ्ठल
718.
उघडा हा मंत्र विठ्ठल वदा वाचे । अनंता जन्माचे दोष जाती ॥१॥
न करी आळस आल्या संसारी । वदा निरंतरी विठ्ठलानाम ॥२॥
साधेल साधन तुटती बंधने । विठ्ठलनाम जाण जप करी ॥३॥
एका जनार्दनी असनीं शयनी । विठ्ठल निशिदिनीं जप करी ॥४॥