सदा पै परिपूर्ण जयाच
727.
सदा पै परिपूर्ण जयाचे रुपडे | तेथेचि माजीवडे मन करी ॥१॥
होईल उद्धार सुटेल संसार | सर्व मायापूर दुरी होय ॥२॥
कांठाळा कायेचा दुरावा मायेचा | हेचि जप वाचा स्मरे नाम ॥३॥
नामा म्हणे करी सर्व हरी हरी | राम हे उत्तरी वाखाणी पा ॥४॥
