वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ८, श्री निवृत्ती प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२१ ते ७५८

प्रकृतीचे पूजन प्राप

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074495 · अभंग क्र. ७२६

726.
प्रकृतीचे पूजन प्राप्तीवीण जाण ।
प्राप्ती सिंचन दोन्ही वाया गेली ॥१॥
पूजन कवणा करु सिंचन कवणा करु ।
नाही नव्हे ते धरु गुरुमुखे ॥२॥
रखुमादेविवरु गुरुमुखा भ्याला ।
होता तो लपाला नाही ते ठायी ॥३॥

अर्थ :
प्रकृति पूजन म्हणजे माया कार्य जो प्रपंच त्याचा सत्यत्वबुद्धीने आजपर्यत केलेला आदर फळावांचून फुकट गेला त्या प्रपंचाची प्राप्ती आणि त्याच्याविषयी केलेला आदर परमार्थदृष्टिच्या विचाराने दोन्ही फुकट गेली. परमात्मदृष्टिच्या विचारांत द्वैत प्रपंचाचा स्वीकार किंवा त्याच्या विषयी आदर करण्याला जागाच नाही. ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व प्रंपचाचा अभाव होतो. ते परमात्मस्वरुप गुरुमुखाने प्राप्त झालेले मनांत धरु. रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल. ते गुरुमुखाने सांगितलेल्या निर्गुण स्वरुपाला भिऊन सगुण झाले. ते पुन्हा निर्गुण झाले असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग