धाडाल तेथे जाईन देवा
728.
धाडाल तेथे जाईन देवा ।
सांगाल सेवा तेचि करीन ॥१॥
लेवलाव ते लेईन लेणे ।
मिरवीन भूषणे कराल ते ॥२॥
सांगाल तेचि ऐकेन गोष्टी ।
धरुनिया पोटी राहेन अर्थ ॥३॥
निळा म्हणे येईन मागे ।
तुम्ही न्याल संगे त्याचि स्थळा ॥४॥
728.
धाडाल तेथे जाईन देवा ।
सांगाल सेवा तेचि करीन ॥१॥
लेवलाव ते लेईन लेणे ।
मिरवीन भूषणे कराल ते ॥२॥
सांगाल तेचि ऐकेन गोष्टी ।
धरुनिया पोटी राहेन अर्थ ॥३॥
निळा म्हणे येईन मागे ।
तुम्ही न्याल संगे त्याचि स्थळा ॥४॥