वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ७. संत महिमा अभंग ७१० ते ७२०

अकार उकार मकार करती

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074563 · अभंग क्र. ७१४

714.
अकार उकार मकार करती हा विचार ।
परी विठ्ठल अपरंपर न कळे रया ॥१॥
संताचे संगती प्रेमाच्या कल्लोळा ।
आनंदे गोपाळांमाजी खेळे ॥२॥
भाळे भोळे भक्त गाताती साबडे ।
त्यांचे प्रेम आवडे विठोबासी ॥३॥
बापरखुमादेविवरू परब्रह्म पुतळा ।
तेथिल हे कळा निवृत्ति जाणे ॥४॥

अर्थ :
ब्रह्मवाचकप्रणव हा अकार, उकार, मकारात्मक आहे. त्याचा योग्यांनी पुष्कळ विचार केला तरी अमर्याद ब्रह्मरूप जो विठ्ठल तो त्यांना कळत नाही. कारण'अमात्र' परमात्मस्वरूपांच्या ठिकाणी मात्रा विभाग नाही. म्हणून त्यांना कळणे शक्य नाही. तोच परमात्मा संताच्या संगतीमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रेमाच्या कल्लोळांत आनंदाने त्या गोपाळामध्ये खेळतो. माझे भाळे भोळे भक्त प्रेमाने भगवन्नाम साबडे प्रेमयुक्त साधे गातात. त्यांचे प्रेम विठोबारायाला फार आवडते. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते ब्रह्माचा पुतळा असून त्याच्या ठिकाणच्या आनंदाचा सोहळा निवृत्तीरायच जाणे असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग