तुमच्या बळे नि:शंक म
721.
तुमच्या बळे नि:शंक मनी ।
गाऊ वदनी हरिनाम ॥१॥
कळिकाळ तोही वंदी माथा ।
तुमच्या शरणागता भिऊंनिया ॥२॥
नुपेक्षी त्या पंढरिनाथा ।
जाणोनि स्थपित संतांचा ॥३॥
निळा म्हणे भूमंडळी ।
संत महाबळी विदीत ॥४॥
721.
तुमच्या बळे नि:शंक मनी ।
गाऊ वदनी हरिनाम ॥१॥
कळिकाळ तोही वंदी माथा ।
तुमच्या शरणागता भिऊंनिया ॥२॥
नुपेक्षी त्या पंढरिनाथा ।
जाणोनि स्थपित संतांचा ॥३॥
निळा म्हणे भूमंडळी ।
संत महाबळी विदीत ॥४॥