वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ८, श्री निवृत्ती प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२१ ते ७५८

अनुभव खूण मी बोले सा

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074491 · अभंग क्र. ७२३

723.
अनुभव खूण मी बोले साजणी ।
निरंजनी अंजन लेइले अंजनी ॥१॥
गुरुमुखे साधन जाले पै निवृत्ति ।
तत्त्वसार आपणचि जाला निवृत्ति ॥२॥
बापरखुमादेविवरा विठ्ठल कृपा चिती ।
पुंडलिका साधिले प्रेम तत्त्वार्थी ॥३॥

अर्थ :
परमात्मसुखाचा अनुभव मला आला आहे. त्याची खूण मी सांगते. ती अशी निरंजन जो परमात्मा हेच एक अंजन मी आपल्या डोळ्यांत घातले. त्याला श्रीगुरुनिवृत्तिरांयाच्या मुखांतून आलेल्या उपदेशाचे सहाय्य झाले. म्हणजे त्यांच्या उपदेशाने सारभूत परमात्मतत्त्व मीच झाले. व सर्व अनात्म धर्मापासूनही निवृत्त झाले. माझ्याचप्रमाणे माझे पिता व रखुमाईचा पती जे दयाघन श्रीविठ्ठल ते प्रेमामुळे तत्त्वार्थाने पुंडलिकासही प्राप्त झाले असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग