वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ८, श्री निवृत्ती प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२१ ते ७५८

अनंत अनंतापरी देखता

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074519 · अभंग क्र. ७३२

732.
अनंत अनंतापरी देखता तो अंतरी ।
हृदयाभीतरी मज निववितो माये ॥१॥
चाळवी चक्रचाळ अलगट गोपाळ ।
याने केला सुकाळ सहज सुखाचा वो माये ॥२॥
सांगवी ते सांगणी उमगुनी चक्रपाणी ।
त्या निर्गुणाचे रहाणी मी रिघाले वो माये ॥३॥
भ्रांतिभूली फेडूनिया निवृत्ति ।
रखुमादेविवरू विठ्ठली गती जाली वो माये ॥
४॥

अर्थ :
जगांत अनंतरूपाने नटलेला श्रीहरि अंतःकरणांत पाहिला असता तो हृदयांतील संसाराची तळमळ शांत करतो. हे जगत चक्र चालविणारा पोरकट स्वभावाचा श्रीगोपाळकृष्ण याने सहज असणाऱ्या आत्मानंदाचा सुकाळ केला. जीवांच्या आत्यंतिक कल्याणाचा जो योग्य उपदेश केला पाहिजे तोच उपदेश हा चक्रपाणी भगवान श्रीकृष्ण करतो. त्या उपदेशाने मी निर्गुण परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी रिघाले व त्याने संसाराची सत्यत्व भ्रांती नाहीसी होऊन श्रीगुरूनिवृत्तिरायांच्या कृपेने माझे पिता व रखुमादेवी पती जे श्रीविठ्ठल, त्या यथार्थ स्वरूपाचे ठिकाणी माझी गति सहज झाली. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग