वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ७. संत महिमा अभंग ७१० ते ७२०

सोळा कळी चंद्र पूर्ण

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074570 · अभंग क्र. ७१७

717.
सोळा कळी चंद्र पूर्णिमे पूर्ण बोधु ।
संतजना उद्बोधु सागरन्याये ॥१॥
नित्यता पूर्णिमा हृदयी चंद्रमा ।
अलिंगन मेघश्यामा देतु आहे ॥२॥
ज्ञानदेवा मोहो निःशेष निर्वाहो ।
रुपी रुप सोह हो एका तेजे ॥३॥

अर्थ :
पौणीमेच्या दिवसी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण झाला असता सागराला ज्याप्रमाणे भरती येते त्याप्रमाणे श्रीहरिस पाहता संतांच्या हृदयरुपी सागरास भरती येते. नित्य परिपूर्ण परमात्मा जो मेघश्याम श्रीहरि तो ज्यांच्या अंतःकरणामध्ये नित्य उदित आहे त्यास अंतःकरणवृत्ति अलिंगन देण्याकरिता सागराप्रमाणे उचंबळुन येते. माझ्या ठिकाणचा देह अहंकार व मोह निःशेष जाऊन परमात्मस्वरुपाचा सोहं भावाचा उदय झाला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग