वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १४. आपल्या स्थितीसंबंधाने देवाशी उद्गार

प्रेम देऊनि सरते केल

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089361 · अभंग क्र. ७१६

716.
प्रेम देऊनि सरते केले ।
आपुल्या नामे गौरविले ।
माझिये वाचे श्रुंगारिले ।
गुणरत्नी अमोघां ॥१॥
सर्वगुणी गुणभरिता ।
सर्व रुपी रुपमंडिता ।
सर्वकळा तू कुशळता ।
साजती अनंता ब्रीदे चरणी ॥२॥
सर्व गोमटा धरीत्या नामे ।
सर्व गोमटा करीत्या कर्मे ।
गोमटा जाणत्या वर्मे ।
सर्वी सर्व गोमटा तू ॥३॥
मुख सुंदर अंगकांति ।
रुपसुंद मदनमूर्ति ।
यश सुंदर तुमची कीर्ती ।
अहो जगपती जगदानिया ॥४॥
निळा तुमचा शरणागत ।
तुमचे नामी ठेविले चित्त्‍ा ।
तुमच्या ब्रिदावळी पढत ।
करावा सनाथ म्हणउनी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग