वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ८, श्री निवृत्ती प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२१ ते ७५८

कापुराचे कळिवर अनळाच

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074511 · अभंग क्र. ७२१

721.
कापुराचे कळिवर अनळाचा मरगळा ।
भेदून द्वैताचा सोहळा केवी निवडो पाहे ॥१॥
बोलु अखरीच वळला भीतरी नाही आला ।
तो केवी विठ्ठला पावे जी तुम्हा ॥२॥
मन बुद्धीसी जे आद्य तयासी जे वेद्य ।
कळिकाळा कवळेना संधि जोडूनि जाये ॥३॥
वाचाळपणे परा येवो नल्हाये दातारा ।
अनुभवो भीतरा बाहेजु वेडावला ॥४॥
निरयदृष्टि ती खोली येऊनी राहे बुबुळी ।
लवण थाव घेऊनी जळी केवी निवडो पाहे ॥५॥
निवृत्तिदासु तेथे निवृत्ति करुनी याते ।
श्रीगुरु निवृत्तिनाथे फुडे केले ॥६॥

अर्थ :
कापुराचे शरीर करुन जर त्याला अग्नी लावला तर ते शरीर अग्नीशी एकरुप होते. मग हा कापूर व हा अग्नी असा भेदभाव कसा निवडावा. शब्द हे केवळ अक्षररुपच असतात. ते केवळ अक्षराच्या योगाने अंतःकरणांत प्रगट होत नसतात. मग अशा विठ्ठलाला तुम्ही कसे पोहोचाल. मन बुद्धीला आद्य असून त्याचेकडून जे प्रकाशले जाणार ते कळीकाळालासुद्धा आकलन न होता त्यालाही सोडून पलीकडे जाते. तो परमात्मा केवळ शब्दाच्या वाचाळपणाने प्राप्त होत नाही. अनुभव झाला तरच तो अनुभव अंतर्बाह्य व्यापून साधक वेडावून जातो. स्वच्छ झालेली दृष्टी ती खोल ज्ञानरुपी बुडांत येऊन राहते. मिठाच्या खड्याने जर जळाचा ठाव घेतला तर त्याला वेगळा कसा निवडून काढावा कारण तो पाणीरुपच होतो. त्या प्रमाणे परमात्माचा अनुभव व घेण्याला निघालेला मुमुक्ष परमात्मरूप होतो. तो त्याच्याहून भिन्न राहत नाही. श्रीनिवृत्ति प्रसादाने प्राप्त झालेली स्थिति, माझ्या निवृत्तिनाथांनी माझ्यावर कृपादृष्टी करुन वरील दृष्टांताप्रमाणे निःसंशय परमात्मरुप केले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग