कासयासी हटयोग धूम्रप
726.
कासयासी हटयोग धूम्रपान । घालुनी आसन चिंती वेगी ॥१॥
सोपा रे मंत्र राम अक्षरे दोनी । जपतां चुके आयणी चौर्यांशीची ॥२॥
मागे बहुतांचा उपदेश हाची । तरले रामनामेंची पातकी जन ॥३॥
एका जनार्दनी रामनाम ख्याती । जाहलीपै विश्रांती शंकरासी ॥४॥
