वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

अभ्यासिले वेद जाला श

🙏 4. संत नामदेव · ABH-083324 · अभंग क्र. ७१९

719.
अभ्यासिले वेद जाला शास्त्रबोध | साधिल्या विविध नाना कळा ॥१॥
प्रेमाचा जिव्हाळा जव नाही अंतरी | तंव कैसा श्रीहरी करील कृपा ॥२॥
हित ते आचरा हित ते विचारा | नामी भाव धरा जाणतेनो ॥३॥
प्रसंगी पुराने ऐकिली श्रवणी | त्यातील कोण मनी धरील अर्थ ॥४॥
काय ते सांडिले काय ते मांडिले | काय ते दंडविले प्रवृत्तीसी ॥५॥
अनंत ह्या मूर्ति पाहिल्या लोचनी | यातील कोण ध्यानी प्रतिबिंबली ॥६॥
स्वप्नाचिया परी देखसी अभ्यास | न धरीच विश्वास चित्त तुझे ॥७॥
वांझेचिये स्तनी अमृताची धणी | मृगजळ पाणी तान्हा बोले ॥८॥
तरी प्रेमेविण कलती क्रियाकर्मे | हाती येती वर्मे विठोबाची ॥९॥
दृष्टीचे देखणे श्रवणीचे ऐकणे | मनाचे बैसणे एक होय ॥१०॥
नामा म्हणे तरी विठो येऊनि भेटे | कायाच पालटे कैवल्य होय ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग