वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ८, श्री निवृत्ती प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२१ ते ७५८

लेउनी अंजन दाविले नि

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074517 · अभंग क्र. ७३०

730.
लेउनी अंजन दाविले निधान ।
देखतांची मन मावळले ॥१॥
ऐसिया सुखाचे करूनिया आळे ।
बीज ते निर्मळ पेरू आता ॥२॥
ज्ञानाचा हा वाफा भरूनिया कमळी ।
सतरावी निराळी तिंबतसे ॥३॥
निवृत्तिप्रसादे पावलो या सुखा ।
उजळलिया रेखा ज्ञानाचिया ॥४॥

अर्थ :
श्रीगुरू निवृत्तिरायांनी माझ्या डोळ्यांत ज्ञानाचे अंजन घालून परमात्मतत्त्वरूपी निधान दाखवले. ते पाहाताच मनाचा मनपणा गेला. आणि परमानंद झाला. त्या परमानंदाचे आळे करून आता त्यात निर्मळ बीज पेरू. हा ज्ञानाचा वाफा हृदयकमळांत भरून निरालंब आत्मस्थिति जिला सतरावी कला म्हणतात ती तुडुंब भरू. मी या सुखाला श्रीगुरू निवृत्तिरायांच्या प्रसादाने प्राप्त झालो. आणि जवळच असलेले ज्ञान उजळले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग