मी माझे भाविता न फिट
715.
मी माझे भाविता न फिटे हे ओझे | कर्मकांड दुजे आड येते ॥१॥
न तुटे हे कर्म न चले हा धर्म | सर्वत्र हे ब्रह्म न कळे तया ॥२॥
मी माझे हे ओझे अहंताची वाहे | परतोनी न पाहे मी कवण ॥३॥
नामा म्हणे नाम स्मरे त्या कृष्णाचे | भय कळीकाळाचे नाही नाही ॥४॥
