तुम्हा आम्हा नित्य भ
724.
तुम्हा आम्हा नित्य भेटी ।
नाही तुटी कल्पांती ॥१॥
प्रभा केवि सांडी भानु ।
हुताशनु दीपनाते ॥२॥
मृतिकेते सांडुनि घटु ।
कैचा पटु तंतुविण ॥३॥
निळा म्हणे आम्हावीण ।
नाहीच देवपण तुम्हासी ॥४॥
724.
तुम्हा आम्हा नित्य भेटी ।
नाही तुटी कल्पांती ॥१॥
प्रभा केवि सांडी भानु ।
हुताशनु दीपनाते ॥२॥
मृतिकेते सांडुनि घटु ।
कैचा पटु तंतुविण ॥३॥
निळा म्हणे आम्हावीण ।
नाहीच देवपण तुम्हासी ॥४॥