वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ८, श्री निवृत्ती प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२१ ते ७५८

जन्माआवर्ती येरझारी

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074515 · अभंग क्र. ७२७

727.
जन्माआवर्ती येरझारी फिटली ।
ब्रह्मसमदृष्टि जाली गुरूमुखे ॥१॥
भागल्याचा सिणु भागल्याने नेला ।
भाग्योदय जाला भाग्येवीण ॥२॥
रखुमादेविवरू भाग्ये जोडला ।
जोडोनी मोडला काही नव्हतेपणे ॥३॥

अर्थ :
जन्ममरणाच्या भोवऱ्यात होणारी माझी येरझार फिटली. कारण श्रीगुरूमुखाने ब्रह्मस्वरूपामध्ये समदृष्टि झाली. जन्ममरणाच्या फेऱ्यांत ज्याला श्रम झाल्याचा सीण झाला होता. त्याच्याकडूनच तो नाहीसा झाला. व्यवहारांत ज्याला भाग्य म्हणतात. त्याहून निराळ्या पारमार्थिक भाग्याचा उदय झाला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते भाग्याने जोडले व त्या जोडण्याने तात्विक नसलेला संसारधर्म नाहीसा झाला असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग