दोरीचाचि सर्प परि हो
727.
दोरीचाचि सर्प परि होय मारक ।
संदेहकारक नोळखता ॥१॥
तैसी परी केली तुम्हा माझया कर्मे ।
सांडविले नेमे स्वधर्मासि ॥२॥
लटक्याचि झकवणे दचक बैसला ।
परि तो प्राण गेला हरुनिया ॥३॥
निळा म्हणे तुम्हा कुंठितचि केले ।
ऐसे माझे झाले कर्म बळी ॥४॥
