नामाचा धारक विष्णुरू
726.
नामाचा धारक विष्णुरूप देख | वैकुंठीचे सुख रुळे पायी ॥१॥
निराकार देव आकारासी आला | भक्ती पै स्थापिला नामरूपा ॥२॥
नाममंत्र बीज जोवरी नाही जया | तोवरी केशव दया नाही प्राप्त ॥३॥
नामा म्हणे नाम केशव केवळ | जाणती प्रेमळ हरीभक्त ॥४॥
