नका पाहू माझे क्रिया
717.
नका पाहू माझे क्रियाआचरित ।
भक्त भागवत नव्हे ज्ञानी ॥१॥
आठविता नाम नेणे दुजी परी ।
मी माझे श्रीहरि नाही गेले ॥२॥
गुंतलोसे पाशी मोह ममता आशा ।
अहो जगदाधीशा पांडुरंगा ॥३॥
निळा म्हणे करा यावरी कैवार ।
अहा करुणाकर म्हणोनिया ॥४॥
