वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ७. संत महिमा अभंग ७१० ते ७२०

भाग्याचा उदयो की दैव

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074568 · अभंग क्र. ७१६

716.
भाग्याचा उदयो की दैवाची गति ।
मज जोडली संगती सज्जनांची ॥१॥
माझे मीच भांडवल घेऊनिया निगुती ।
लाभाची गति श्रीविठ्ठलु ॥२॥
देशदेशाउरा नलगेची जाणे ।
ठायींच जोडणे एक्या भावे ॥३॥
खेपखेपांतर अनेक सोशिले ।
मुद्दल उरले लेखा चारी ॥४॥
मुद्दल देऊनि वाणेरा फेडिला ।
उत्तीर्ण झाला दोही पक्षी ॥५॥
चौघे साक्ष ठेवुनी अतरी ।
वेव्हार ज्ञानेश्वरी खंडियेला ॥६॥

अर्थ :
आज मला संताची संगती घडली. हा माझा भाग्योदय म्हणा किंवा दैवाची गति म्हणा. माझे मीच चांगल्या पुण्याईचे भांडवल घेऊन श्रीविठ्ठलाचा लाभ मिळविला. देश देशांतराला न जाता ऐक्य भावाने जागचे जागीच याचा लाभ झाला. अनेक जन्माच्या खेपा करण्याचे कष्ट सोसले. त्यामुळे चार वेदाने वर्णन केलेले परमात्मस्वरुप ते माझे मुद्दल उरले. ते मुद्दल परमात्म्याने मला देऊन अनेक प्रकारचे देह घेण्याचा प्रकार फेडला. त्यामुळे मी दोन्ही कुळांत उर्तीर्ण झालो. चारी, वेदाची साक्ष मनांत घेऊन मी व्यवहार खंडून टाकला असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग