दोन्ही डोळा अवलोकिता
726.
दोन्ही डोळा अवलोकिता ।
धणी न पुरे पंढरीनाथा ॥१॥
चित्त वेधले चिंतने ।
मनहि तदाकारध्याने ॥२॥
वाचा कुंठित राहिली ।
बुध्दिहि निमग्मचि ठेली ॥३॥
निळा म्हणे अवघींच अंगे ।
रंगली त्याची विठ्ठल रंगे ॥४॥
726.
दोन्ही डोळा अवलोकिता ।
धणी न पुरे पंढरीनाथा ॥१॥
चित्त वेधले चिंतने ।
मनहि तदाकारध्याने ॥२॥
वाचा कुंठित राहिली ।
बुध्दिहि निमग्मचि ठेली ॥३॥
निळा म्हणे अवघींच अंगे ।
रंगली त्याची विठ्ठल रंगे ॥४॥