अचुक साधन कष्ट नाही
721.
अचुक साधन कष्ट नाही कांही । वाचे विठ्ठलरखुमाई म्हणे सुखें ॥१॥
जन्ममरणाच्या तुटतील खेपा । सोपा होय बापा मार्ग तुज ॥२॥
बहुत मार्ग बहुत साधन । परी वाचा जाण शीण दुर्गम ते ॥३॥
एका जनार्दनी कष्ट ना सायास । म्हणा वाचे विठ्ठलास जीवेंभावें ॥४॥
