पदोपदी निजपदा गेले व
724.
पदोपदी निजपदा गेले वो ।
कर्म संचित सकर्म जाले वो ॥१॥
तेथे आपुले नाठवे काही वो ।
आपआपणा न पडे ठायी वो ॥२॥
श्रीगुरुप्रसादे ज्ञान बोधु झाला वो ।
नव्हे ते ठाउके पडिले माय वो ॥३॥
अर्थ :
क्षणोक्षणी परमात्मचिंतनाचा ध्यास घेतल्यामुळे. मी परमात्मपदाला प्राप्त झाले. व त्या बोधाने माझे बरेवाईट सर्व संचित कर्म सत्कर्मच झाले. त्या परमात्म्याचा यथार्थ बोध झाल्यामुळे माझ्या ठिकाणचा देहात्मभाव नाहीसा होऊन गेला. इतकेच काय देहात्मभाव नष्ट झाला याचीही आठवण मला राहिली नाही. याला कारण श्रीगुरु निवृत्तिरांयाची कृपा त्या कृपेनेच मला ब्रह्मात्मबोध झाला. त्यामुळे आतापर्यंत माहित नसलेला परमात्मा मला कळला. असे माऊली सांगतात.
