वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

सुख ते आपुले चोरांशी

🙏 4. संत नामदेव · ABH-083427 · अभंग क्र. ७१८

718.
सुख ते आपुले चोरांशी वाटिले | पाळते घेतले दु:ख त्यांचे ॥१॥
नित्य नवी त्याची सोसिता सोसिणा | नयेचि तुज अझोनी वीट मना ॥२॥
ऐसा तू निर्लज्ज पाहे आत्मघाती | कैसी तुझी खंती न वाटे तुज ॥३॥
लक्ष या चौऱ्याशी सोसिता यातना | भोगिसी पतना ज्यांच्या संगे ॥४॥
त्याते भजसी सांग पुढती कोण्या मोहे | विचारूनि पाहे तुझा तूचि ॥५॥
सदा चिंतातूर होऊनि दीनरूप | संकल्प विकल्प करिसी किती ॥६॥
नाथिलाची छंदु नाहीत्या दुराशा | भोवसी दाही दिशा तळमळीत ॥७॥
त्यांची इंद्रिये बापुडी असती केविलवाणी | विषया लागोनी लोलंगिती ॥८॥
तू हे आशा करिसी निरंतरी | जालासी भिकारी कृपणाचा ॥९॥
आले काळभय हाकीत टाकीत | मूढा तुझे हित कोण करी ॥१०॥
त्रिभुवनी समर्थ बळी जगजेठी | रिघे त्याचे पाठी म्हणे रामनाम ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग