मागे उदंड साधने केली
714.
मागे उदंड साधने केली ।
उत्तीर्ण ती झाली कर्मफळे ॥१॥
परि तुमचे नेदितीच प्रेम ।
वाढविती श्रम संसारीचा ॥२॥
जया नाही मार्गाची ठावा ।
काय ते गावा पावविती ॥३॥
निळा म्हणे काटवणी ।
घालती घालणी जाणिवेच्या ॥४॥
714.
मागे उदंड साधने केली ।
उत्तीर्ण ती झाली कर्मफळे ॥१॥
परि तुमचे नेदितीच प्रेम ।
वाढविती श्रम संसारीचा ॥२॥
जया नाही मार्गाची ठावा ।
काय ते गावा पावविती ॥३॥
निळा म्हणे काटवणी ।
घालती घालणी जाणिवेच्या ॥४॥