वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

उपदेश विव्हळ न कळे य

🙏 4. संत नामदेव · ABH-083364 · अभंग क्र. ७१६

716.
उपदेश विव्हळ न कळे याचा अर्थ | वायाची हा स्वार्थ प्रपंचाचा ॥१॥
सांडी हा प्रपंच मिथ्या लवलाहो | विठ्ठल हा टाहो नित्य करी ॥२॥
हरी हरी भजन भज दयाशीळ | होसील निर्मळ ब्रह्मरूप ॥३॥
सर्व हा आकार हरीचे शरीर | मायेचा विकार भुलो नको ॥४॥
आप तेजी ब्रह्म हरी माझा सम | आदि अंती नेम विठ्ठल हरी ॥५॥
नामा म्हणे उपमा काय द्यावी त्यासी | नाम तारी सर्वासी कलीमाजी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग