वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 47. विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३

अगम्य तुझा खेळ । ब्र

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084101 · अभंग क्र. ६८१

681.
अगम्य तुझा खेळ । ब्रह्मादिका तो अकळ ।
नेणवेचि सबळ । वेदशास्त्रां ॥१॥
तो वसे पंढरपुरीं । कट धरिले दोनी करी ।
पीतांबर साजिरी । बुंथी शोभे तयासी ॥२॥
तुळशीमाळा शोभती गळा । कांसे कसिला सोनसळां ।
पदक आणि वनमाळा । वैजयंती शोभती ॥३॥
वामभागी ती रुक्मीणी । राही सत्यभामा दोन्ही ।
पुढे पुंडलीक मनी । तीर्थ ते चंद्रभागा ॥४॥
वेणुनाद गोपाळपुर । पद्माळें ते परिकर ।
बिंदुतीर्थ सर्वेश्वर । सभोंवती शोभातातीं ॥५॥
गरुड हनुमंता दोन्ही । शोभाताती राउळांगणीं ।
विठ्ठमूर्ति धणी । पाहतांचि सुखावें ॥६॥
भक्त उभे सहपरिवार । करिती नामाचा गजर ।
एका जनार्दनी परिकर । सेवा तेथे करितसे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग