अवचित लोखंड हाणी दुश
694.
अवचित लोखंड हाणी दुश्चितपणे ।
तया ऐसे आन पाप नाही ॥१॥
ऐसे ते जाणावे मतीचे चांडाळ ।
प्रचीतीचे बळ न दिसे तया ॥२॥
निद्रितावधी अग्नी लावी घरा ।
पातेजोनि बरा विष घाली ॥३॥
बहिणी म्हणे ऐसे विश्वासघातकी ।
वास त्या नरकीं सर्वकाळ ॥४॥
