वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

चातकेवीण लक्ष अंतरीच

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074348 · अभंग क्र. ६८३

683.
चातकेवीण लक्ष अंतरीच ठसले ।
तेथे एक वोळले ब्रह्ममेघ ॥१॥
ते जीव अमृत जीवास जाले ।
त्याहुनी एक आगळे गे माय ॥२॥
रखुमादेविवरू हातेंवीण स्पर्शले ।
चक्षुवीण देखिले निजब्रह्म गे माये ॥३॥

अर्थ :
चातकपक्षी पाणी मिळण्याकरता मेघाकडे लक्ष देतो. हे सर्वांना माहित आहे. त्याप्रमाणे माझे लक्ष अंतर्यामी आत्मस्वरूपाकडे लागले आहे तेंव्हा तेथे ब्रह्मरूपी मेघ आनंद अमृताचा वर्षाव करणारा असा पाहीला. तेव्हा त्याच्यापासून जीवाचे जीवन जी परमात्मवस्तु ती जीवास प्राप्त झाली. आता त्याहून श्रेष्ठ दुसरे कोण आहे. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच ब्रह्म त्याला मी हातावांचून स्पर्श केला. व डोळ्यांवाचून पाहिले असे आत्मरूप ब्रह्म पाहिले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग