वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

काळा लपंडाई काळेरात्

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074313 · अभंग क्र. ६९४

694.
काळा लपंडाई काळेरात्री खेळे ।
मी सवे वेधिली जाय काळ्याछंदे ॥१॥
काळे निळे हे अभ्र भासले ।
ऐसे रूप देखिले निर्गुणाचे ॥२॥
ऐसा हा सांवळा माझिये दृष्टि माल्हाथिला ।
उजरूनि गेला हा विठ्ठलु गे माये ॥३॥
ऐसे भुलविले जाण काळेपणे आपणे ।
रखुमादेविवरू जाणे येर काही नेणे ॥४॥

अर्थ :
काळीरात्री म्हणजे अविद्या रात्रीच्या काळोखात हा काळा म्हणजे शुद्ध श्रीकृष्ण लपंडाव खेळत आहे. मला परमात्मप्राप्तीचा वेध लागल्यामुळे मी त्या काळ्या श्रीकृष्णाच्या छंदाने त्याच्याकडे गेले. तिकडे गेल्यावर निर्गुण जो परमात्मा त्याचे काळ्या निळ्या आकाशाप्रमाणे सगुणरूप पाहिलें. असा हा सांवळा श्रीकृष्ण परमात्मा माझ्या दृष्टीत येऊन बसला. आणि माझी दृष्टि निवळ करून हा श्रीविठ्ठल परमात्मा गेला. अशा या काळ्या रूपांनी मला भूलवून टाकले. त्यामुळे रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांच्या शिवाय मी दुसरे काही जाणत नाही. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग