सर्व देवांचा तू देव
691.
सर्व देवांचा तू देव ।
तुजहुनी देव थोर कोण ॥१॥
तुज सांडुनि नारायणा ।
वंदू चरणा कोणाचिये ॥२॥
निवारील माझी चिंता ।
ऐसा कोण दाता तुजवीण ॥३॥
तुझी होता अवकृपा ।
कोण कृपा करू धजे ॥४॥
बहिणी म्हणे पायी राखा ।
माजे न देखा गुणदोषा ॥५॥
