वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

ते अवघेचि नव्हे अवघे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074308 · अभंग क्र. ६८४

684.
ते अवघेचि नव्हे अवघेचि होय ।
अवघ्यावीण सोय आणिक असे ॥१॥
अवघे म्हणिजे व्योमाकार दिसे ।
त्याहुनी परते असे गे माय ॥२॥
रखुमादेवीवरू परता पहावया गेले ।
परते पराहूनि देखिले गे माय ॥३॥

अर्थ :
जगत् ब्रह्म नव्हे, पण सर्व जगत् ब्रह्मरूप आहे. कारण जगत् अध्यस्त आहे. म्हणून सर्व जगताहून परमात्म्याची स्वरूपस्थिती काही निराळीच आहे. आकाशादि जगत् त्याहून ते परब्रह्म निराळे आहे. रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांना पहावयाला गेले, तेंव्हा ते परेच्याही पलीकडे आहे असे दिसले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग