धरियेले तुझे पाय ।
690.
धरियेले तुझे पाय ।
आता सोय करी बापा ॥१॥
नको लावू लोटोनीया ।
पंढरीराया कृपावंता ॥२॥
लोखंड लागता परिसा ।
सुवर्ण कैसा न होय बा ॥३॥
जरी झाले ऐसे तरी ।
उरे केवी थोरी परिसाची ॥४॥
बहेणि म्हणे कोण थोर ।
तुजहुनी पामर हा उद्धराया ॥५॥
