वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

स्मरो कैसेनी विस्मरो

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074333 · अभंग क्र. ६८०

680.
स्मरो कैसेनी विस्मरो कैसेनी ।
दोहीपरी मज अटी रया ॥१॥
पाडु पडिला विषम ठायी ।
देता घेता नुरेचि काही ॥२॥
रखुमादेविवरू विठ्ठलु नेणिजे ।
तव तोचि तयासी अटीवी रया ॥३॥

अर्थ :
मी आपल्या आत्मस्वरूपाचे स्मरण किंवा विस्मरण कसे करावे? ते माझ्याकडून होणे शक्य नाही. ब्राह्मण व्यक्तिला ब्राह्मणपणाचे स्मरण किंवा विस्मरण होत नाही. याचे कारण त्या व्यक्तिला ब्राह्मणपणाचा निःसंदेह बोध असतो. त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी ब्रह्मबोधाचा दृढनिश्चय असल्यामुळे माझ्या ठिकाणी स्मरण किंवा विस्मरण कसे होणार? प्रथम आपल्या स्वरूपाचे विस्मरण होणे आणि नंतर विस्मरणाच्या नाशाकरिता स्मरण करणे या दोन्हीही खटपटीच आहेत. द्वैताविषयी माझ्या ठिकाणी किंमत नसल्यामुळे देण्याघेण्याला तरी उरले काय? काहीच नाही. रखुमादेवीचे पती, श्रीविठ्ठल जोपर्यंत जाणला नाही तोपर्यंत श्रीविठ्ठल त्याला कष्ट देईलच. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग