वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

मी बोल बोले तो गेला

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074366 · अभंग क्र. ६९०

690.
मी बोल बोले तो गेला कवण्या ठाया ।
हे पुसो आलो लवलाह्या वो ।
कव्हणि न सांगती मागू धावे काह्या ।
आता लाजिले ऐशा स्नेहा गे माये ॥१॥
चला कांवो मज आडोनी ।
रूप पाहो द्या का माझे मजलागुनी ।
वेडावले मज देखुनी शेखी ।
मी माझे गेले हारपोनी गे माये ॥२॥
मी बोला मज आंतु की बोल मजआतु ।
मुसे मुराले रूप रूपातु ।
बापरखुमादेविवरू विठ्ठलासी एकांतु ।
आता पुरला अंतु दुजेपणा गे माये ॥३॥

अर्थ :
मी त्या भगवंताचे शब्दाने पुष्कळ वर्णन केले. असे का झाले म्हणून शास्त्राला व संतांला घाईघाईने विचारवयास गेले. तो तेथेही शब्दाचा काही मागमोस लागला नाही. तेंव्हा मला असे कळले की शब्दाने भगवंताचे वर्णन करणे वेडेपणाचे आहे. अशा शाब्दिक प्रेमाने तो आकलन होणारा नाही. याप्रमाणे माझी मलाच लाज वाटून त्या भगवंताच्या प्रेमाने मी भुलून गेले. त्या परमात्म्याच्या दर्शनामध्ये आड येणाऱ्याला एका बाजुला सारून मी त्या श्रीकृष्ण परमात्म्याचे दर्शन घेतले. त्याचा परिणाम असा झाला की माझ्या ठिकाणचा मीपणा नाहीसा झाला. तेंव्हा मला असा विचार पडला की माझ्या स्वरूपात शब्द आहे किंवा शब्दांत माझे स्वरूप आहे. किंवा रूपांत रूप आहे हे सर्वभाव स्वस्वरूपाच्या ठिकाणी मुरून गेले. याप्रमाणे माझे पिता व रखुमाईचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्याशी ऐक्य झाल्यामुळे द्वैतदशेचा अंतच होऊन गेला. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग