जप तप अनुष्ठान हरी |
682.
जप तप अनुष्ठान हरी | एकचि तो नमस्कारी |भूतद्वेष कदा न करी | तप सामुग्री हेचि तुझी ॥१॥
हरी माधव यादवा | कृष्णा गोविंदा केशवा |येणे करोनिया जीवा | सर्वकाळ रंजवी ॥२॥
स्मरता हरीचे नाम | पळोनी जाति काळयम |तुटती नाना योनी जन्म | गर्भवासा मग नये ॥३॥
नामा जपे नामावळी | अखंड तप हेचि सदाकाळी |हरिनामे पिटोनी टाळी | हाचि तरणोपाय सकळांचा ॥४॥
