तुमचे गुण गाता नावडत
687.
तुमचे गुण गाता नावडती तुम्हा ।
काय ठावे आम्हा ऐसे आहे ॥१॥
गोडी स्वरूपाची लागलीसे फार ।
वरी प्रेमभर पडियेला ॥२॥
म्हणोनी जाहाले मन आजी वेडे ।
तुम्हासी सांकडे घातीयेले ॥३॥
बहिणी म्हणे तरी न करा उपेक्षा ।
पुरवा अपेक्षा भेटीची गा ॥४॥
