वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

आहे ते पाही नाही ते

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074391 · अभंग क्र. ६८७

687.
आहे ते पाही नाही ते काही ।
ठायींच्या ठायी हरपले ।
नाही आम्हा काज नाही आम्हा चोज ।
आमुचे निज गोविंदराज ॥२॥
बापरखुमादेविवरू आनंद सोहळा ।
ब्रह्मानंद कळा भोगितसे ॥३॥

अर्थ :
तुम्ही सर्वठिकाणी व्यापक असलेल्या परमात्म्याला पहा वंध्यापुत्राप्रमाणे नसलेल्या प्रपंचाला पाहून काय उपयोग? परमात्म्याला पाहिले तर ठायींच्या ठायी म्हणजे पहाणाऱ्याच्या ठिकाणचा पाहाणेपणा परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी हारपून जातो. आम्ही त्या परमात्म्याला पाहिल्यामुळे आम्हाला या जगांत काही एक कर्तव्य उरले नाही. तसेच जगतांतील मायिकपदार्थाचे आम्हाला कौतुकही वाटत नाही. आमचे अंतःकरण गोविंदरूपच होऊन गेले आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते आनंदरूप आहेत. व त्या आनंदाचा सोहळा आम्ही भोगीत आहोत, असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग