संताचा तो संग जाहालि
693.
संताचा तो संग जाहालियावरी ।
उणा केवि हरी होय तेथे ॥१॥
देवही इच्छिती संग त्यांचा घडो ।
देह कार्यी पडो संतांचिये ॥२॥
न वर्णवे तो संतांचा महिमा ।
किती ही उपमा न देता पुरे ॥३॥
बहिणी म्हणे जैसी प्रारब्धाची रेषा ।
तैसे जगदीशा करणे भाग ॥४॥
