कस्तुरीची उटी टिळक ल
678.
कस्तुरीची उटी टिळक लल्लाटीं । सांवळां जगजेठी उभा विटे ॥१॥
नाम हे चांगले रुप हे चांगले । दरुशन चांगलें विठोबाचें ॥२॥
आला पंढरीसी पुंडलिकाचें भक्ति । दरुशने मुक्तिं पातकीयांसी ॥३॥
एका जनार्दनी आनंदाचा कंद । उभा तो गोविंद विटेवरी ॥४॥
