अजुनी का न ये तुमचिय
685.
अजुनी का न ये तुमचिये ध्यानी ।
किती विनवणी करू देवा ॥१॥
कृपाळूपणाची मेळविली ख्याती ।
म्हणोन का श्रीपती कंटाळला ॥२॥
भक्त झाले फार आला का कंटाळा ।
द्रौपदीवेल्हाळा सांगा तरी ॥३॥
बहिणी म्हणे कीर्त्ति आयकीयेली कानी ।
चालत चरणी आले येथे ॥४॥
