वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

तनुमनुधने पूज्य पै क

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074397 · अभंग क्र. ६८५

685.
तनुमनुधने पूज्य पै केले ।
आत्मलिंग पूजिले बाइये वो ॥१॥
तव निराकार देखिले निराकार देखिले ।
मी पूजनलिंग तिन्ही हरपले ॥२॥
रखुमादेविवरू निजलिंग विवळले ।
अवघी अवघे ठायी सामावले बाईये वो ॥३॥

अर्थ :
मी तन, मन, धनाने आत्मलिंगाचे पूजन केले. त्यावेळी निराकार परमात्म वस्तुचे दर्शन मला घडले. त्यामुळे पूजा करणारा मी, पूज्य लिंग आणि त्याची पूजा ही त्रिपुटी नाहीसी होऊन गेली. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, हे कोणी आत्मलिंग ते आत्मलिंग प्रगट झाले. अशा प्रगट झालेल्या आत्मलिंगाचे ठिकाणी मी एकरूप होऊन गेले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग