तुझे यश गाता शेष स्त
684.
तुझे यश गाता शेष स्तब्ध झाला ।
परी नाही कळला पार तया ॥१॥
तेथ माझा पाड काय वर्णी गुण ।
अवघाचि शीण होईल पै ॥२॥
इंद्रादि सुरगण वंदिती जयाला ।
तो हरी सापडला पुंडलीका ॥३॥
बहिणी म्हणे रूपे ते देखलिया डोळा ।
धाक कळिकाळादिका पडे ॥४॥
