वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

माझी प्रकृति निष्कृत

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074323 · अभंग क्र. ६९२

692.
माझी प्रकृति निष्कृति जाली ।
ब्रम्ही सामावली बाईये वो ॥१॥
देहेंवीण ब्रह्म देखे देहेवीण ब्रह्म देखे ।
तेणे निर्गुण राखे रोखावले ॥२॥
जाणता म्हणोनी नेणता पै गेले ।
शेखी आपणाते विसरले बाईये वो ॥३॥
रखुमादेविवरू नेणोनी जाणितला ।
जाणपणे निमाला माझ्या ठायी ॥४॥

अर्थ :
माझी प्रकृति निष्कत्ती म्हणजे क्रियाशून्य होऊन ब्रह्माच्या ठिकाणी सामावली. ते ब्रह्म देहात्मभाव टाकूल पहा, जो असे ब्रह्म पाहील तो निर्गुण रूपाने होऊन जाईल. आम्ही परमात्मस्वरूप जाणले असे जे अभिमानाने म्हणतात. त्यांना परमात्मस्वरूप कळले नाहीच. शेवटी अशा ज्ञानाच्या अभिमानाने आपल्या स्वरूपास मात्र विसरतात. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते ज्ञानाचे विषय नाही असे समजून मी जाणला. त्यामुळे तो ज्ञानरूपानेच माझ्या स्वरूपांच्या ठिकाणी ऐक्य पावला. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग