सुखे घाली तू वैजयंती
679.
सुखे घाली तू वैजयंती ।
मज खंती नसे त्याची ॥१॥
माणिक मोती घाली गळा ।
तुळसीमाळा पुरे आम्हा ॥२॥
केशरकस्तुरीचा तुला टिळा ।
आम्हा भाळा नाममुद्रा ॥३॥
थोर आयुधे तुझे हाती ।
आम्हा हाती टाळ दिंडी ॥४॥
बहिणी म्हणे एणे आम्हा ।
सौख्यप्रेमा वाटतसे ॥५॥
